
कृषि उत्पन्न बाजार समिती, दुधनी ता. अक्कलकोट जि. सोलापूर
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे दिनांक 13 मार्च 1954 रोजी अक्कलकोट बाजार समितीचे उप बाजार म्हणुन स्थापना करण्यात आली. अक्कलकोट बाजार समितीस दुधनी उपबाजाराकडुन भरपुर उत्पन्न मिळत असुनही अक्कलकोट बाजार समितीने दुधनी दुय्यम बाजार आवारासाठी 18 एक्कर जमीन खरेदी केली परंतु शेतकरी व आडते-व्यापारी यांचेकरीता कोणत्याही प्रकारच्या सोईसुविधा पुरविलेल्या नाहीत. दुधनी बाजार क्षेत्रातील सर्व शेतकरी,व्यापारी, यानी दुधनीकरीता स्वतंत्र बाजार समितीची स्थापण्याकरीता हालचाल सुरु करुन त्याप्रमाणे राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाकडुन चौकशी होऊन दुधनीकरीता स्वतंत्र बाजार समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे मा.जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांचेकडुन दिनांक 14-8-2007 रोजी दुधनीकरीता स्वतंत्र समिती म्हणुन अधिसुचना जारी करण्यात आली. त्यापमाणे अक्कलकोट व दुधनी अश्या दोन स्वतंत्र बाजारपेठा निर्माण करण्यात आल्या. त्यानुसार दुधनी बाजार समितीवर श्री ए.जे.भिलारे, सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,सोलापूर यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आली व बाजार समितीच्या प्रत्यक्षात कामकाजास दिनांक 21-8-2008 पासुन सुरवात करण्यात आली.
सर्व माहितीसाठी....